कोलाड (श्याम लोखंडे)
स्वच्छता अभियान कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे व इंजिनियर हरिओमभाऊ टाळकुटे यांच्या संकल्पनेतुन
रोहा तालुक्यातील कोलाड विभागीय क्राँगेस पार्टी कमिटीच्या वतीने मौजे पहुर येथील लांगतवाडीमध्ये स्वच्छता अभियान कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे व इंजिनियर हरिओमभाऊ टाळकुटे यांच्या संकल्पनेतुन हे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले आहे...यावेळी कोलाड विभाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरिओम टाळकुटे,किल्ले गावं काँग्रेस कमिटी अध्यक्ष मंगेश जाधव ,किल्ले गांव काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिनेश जाधव,सेक्रेटरी लक्ष्मण पवार ,ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण मामा हिलम, कार्यकारी सदस्य नितिन कोळी,खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष समिर पवार,सेक्रेटरी विनायक कोळी, आदी लांगत वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते...
अभियान राबवताना तसेच विविध उपक्रम करत असताना कोणताही झेंडा वा बॅनरबाजी नाही...
कोलाड विभाग काँग्रेस कमिटीच्यावतीने या विभागात विवीध उपक्रम राबविला जात असून यावेळी हरिओम भाऊ टाळकुटे यांनी अभियान समाप्त झाल्यावर अभियानात ग्रामस्थांनी उस्फुर्त पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञतापुर्वक आभार व्यक्त केले...तसेच ग्रामस्थ नागरिकांनी विविध प्रश्नांबाबत चर्चा विभाग कमिटी अध्यक्ष हरिओमभाऊ टाळकुटे यांच्याशी केली असता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन विविध प्रश्नांचा पाठपुरावा करून विशेष लक्ष दिले जाईल असे सांगितले...यावेळी बोलताना हरिओम भाऊ टाळकुटे यांनी आपला पक्ष जरी राजकिय असला तरी आपल्या पक्षाच्या माध्यमातुन ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण करणार असल्याचे सांगत अभियान राबवताना तसेच विविध उपक्रम करत असताना कोणताही झेंडा वा बॅनरबाजी करत नसल्याचे सांगितले...
