रोहा तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नसल्याची ठेकेदाराना दिली तंबी .
रोहा प्रतिनिधी( श्याम लोखंडे ):विकास निधी मंजूर होऊन सुध्दा काम जलद गतीने होत नसून तसेच निकृष्ट दर्जाची कामे यामुळे नागरीकांची तक्रार आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे प्राप्त झाली होती... या पार्श्वभूमीवर आ.अनिकेत तटकरे यांनी
रोहा पंचायत समीती येथे आढावा बैठक बोलावली असुन या बैठकीत जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामे जलद गतीने व दर्जेदार करण्याची सुचना आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी केली... तसेच नागरीकांना यामुळे झालेला कोणताही मनस्ताप सहन केला जाणार नाही तसेच तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नसल्याची ठेकेदाराना.आ. तटकरे यांनी तंबी दिली...
बैठकीत जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचा आढावा तसेच विविध विषयांवर चर्चा
सदर आयोजित बैठकीत जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचा आढावा तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली... यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, रामचंद्र सपकाळ, अनिल भगत, दया पवार, भोसले, राजुशेठ पोकळे, रामचंद्र चितळकर, सुरेश महाबले तसेच सर्व सरपंच तसेच गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, ठेकेदार, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते...
रोहा तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत हर गाव हर घरमे पाणी ही केंद्र सरकार मार्फत योजना सर्वत्र राबविली जात आहेत. ही कामे होत असताना शासकीय अधिकारी व ठेकेदार यांचे कडून मनमानी पणे कामे होत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी आ. अनिकेत तटकरे यांनी ही आढावा बैठक घेत युद्ध पातळीवर सुरू असलेली सर्व कामे ही नियमानुसार करण्याच्या सुचना अधिकारी वर्गाला दिल्या. यासोबतच कोणतेही निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नसल्याची तंबी या प्रसंगी आ. अनिकेत तटकरे यांनी संबधित ठेकेदाराना दिली .
