पुगाव - खांब प्रतिनीध (नंदकुमार कळमकर )
शिव शंभो सांस्कृतिक क्रिडा मंडळ खांब मध्यवर्ती कार्यालयाचे खांब येथे.शानदार शुभारंभ
सामर्थ्यातून सेवा,आणि सेवेतून सामर्थ्य ही संकल्पना राबविण्याचे काम खांब विभागातील तरुणांनी एकत्रित एकसंघ हाती घेतला असून या पार्श्भूमीवर येथील नागरिकांना त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या उद्दशाने नवी दिशा नवी संकल्पना हाती घेत सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण,आरोग्य,वैद्यकीय,कृषी, कला, क्रिडा,रोजगार ,व्यवसाय,आदी उद्दिष्ट्ये घेऊन ही सामाजिक संस्था काम करणार असल्याने शिव शंभो सांस्कृतिक क्रिडा मंडळ खांब मध्यवर्ती कार्यालयाचे शानदार शुभारंभ खांब येथे करण्यात आला...रविवारी ३ सप्टेंबर रोजी विभागीय युवकांचे प्रेरणास्थान दिलीप लाडगे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत धामणसे,नथूराम तेलंगे,पत्रकार तथा खांब विभागीय ओबीसी समन्वय समिती चे अध्यक्ष डॉ श्याम भाऊ लोखंडे, उपाध्यक्ष दिलीप मोहिते यांचे शुभ हस्ते संस्थेच्या कार्यालयाचे शानदार शुभारंभ करण्यात आले...
संस्थेचे पदाधिकारी आदी युवक तरुण तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित
यावेळी संस्थेचे पदाधिकारी विनोद खामकर,अलंकार खांडेकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मरवडे, रविंद्र लोखंडे,पत्रकार विश्वास निकम, नंदकुमार कळमकर, संस्थेचे सदस्य मारुती टेवले,निलेश टवले, विवेक मोहिते,गणेश टवले,योगेश खामकर, नितीन खामकर,निलेश खामकर, विलास सुर्वे,केदार मोहिते, नथूराम तलंगे,रोहित भोसले, किरण टवले, विनायक खामकर, संजय,उदय तेलंगे, प्रसंजित कांबळे,भास्कर खामकर, विशाल बामणे,वामन लाडगे,भाई टवले,बाळा सानप, सुमित टवले,निखिल टवले,सचिन खामकर, राहुल मोहिते, कल्पेश टवले,देवराज टवले,योगेश टवले,समीर लाडगे,महेश खामकर, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर खामकर,महेश चितळकर, मंदार पार्टे,आदेश सानप,विजय खामकर,प्रथेश गोडबोले,संकेत टवले,महेश टवले, मनोज चितळकर , अजय मुदगल, गणेश राऊत , हिराजी लाडगे ,वैभव सावरकर , अजय सानप, ऋषीकेश वेदक, विकी पवार , उदय मोदी ,विशाल खामकर , संतोष भुवड , संतोष खामकर, विजय टवले ,राकेश कांबळे,शेखर वेदक, बँकेश सोननीस, स्वप्नील गुरव,आदी युवक तरुण तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते...
सर्वांनी एकसंघ राहून नागरिक,शेतकरी,युवक यांना संस्थेच्या माध्यमातून सुविधा देण्याचा करणार प्रयत्न
यावेळी दिलीप लाडगे,पत्रकार तथा खांब विभागीय ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ श्याम भाऊ लोखंडे, उपाध्यक्ष दिलीप मोहिते, रविंद्र लोखंडे,यांनी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की विभागातील सर्वांगिक हितासाठी या संस्थेची स्थापना झाली आहे. या परिसरात नागरिकांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळाव्या त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने संघटनेची गरज होती...येथील तरुणांनी पुढाकार घेऊन समाजातील चांगली युवा पिढी व लोक एकत्र येऊन संघटना उभी केल्याने खूप आनंद होत आहे.. आता पूर्ण खांब विभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहून खऱ्या अर्थाने येथील नागरिकांना शेतकऱ्यांना युवकांना अधिक अधिक त्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करावा यासाठी तरुणांना भावनिक साद घातली...तुम्ही हाक मारत जा, आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत...या भागासाठी आपल्याला अनेक उपक्रम राबविन्यात येतील असे सांगितले...
कार्यक्रमांचे सूत्र संचालन आभार प्रदर्शन अलंकार खांडेकर यांनी केली
सामाजिक, शैक्षणिक, कला , क्रीडा, आरोग्य, वैद्यकीय,पर्यावरण,कृषी रोजगार, व्यवसाय, आशा विविध प्रकारच्या बाबींवर लक्ष वेधून काम करणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमावर अधिक माहिती देत व उद्दिष्टे सांगत सदर कार्यक्रमांचे सूत्र संचालन आभार प्रदर्शन अलंकार खांडेकर यांनी करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील युवकांनी अथक परिश्रम घेतले.
