महाराष्ट्र वेदभुमी

मराठा आंदोलन माणगाव शहर कडकडीत बंद



माणगाव प्रतिनिधी : (सिकंदर आंबोणकर)

जालना जिल्ह्यात मराठा बांधव लाठीचार्ज निषेधार्थ रायगड सकल मराठा समाज यांच्यावतीने माणगाव शहरांमध्ये कडकडीत बंद 

जालना जिल्ह्यात मराठा बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावर सनदशीर व शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना  आंदोलन कर्त्यांवर पोलिस प्रशासनाकडुन अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला... पोलिसांनी केलेल्या आमानुष कृत्यासाठी त्याच्या निषेधार्थ माणगाव तालुका बंद..ची हाक दि.०४/०९/२०२३ रोजी दक्षिण रायगड सकल मराठा समाज यांच्यावतीने देण्यात आली होती...ह्या मोर्चात मराठ्यांच्या सर्व संघटना सामील झाल्या होत्या...या मोर्चाला पाठींबा देत माणगाव शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला...




सरकारच्या विरोधात घोषणा देत  माणगाव प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन सांगता

मोर्चाची सुरूवात बालाजी कॉम्प्लेक्स येथून झाली असून सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन सांगता करण्यात आली.....सदर बंद व मोर्चामध्ये समाजाचे तरूण,महीला,विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

Post a Comment

Previous Post Next Post