महाराष्ट्र वेदभुमी

चणेरा विभागात खैराची तस्करी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी!



खांबेरे हद्दीतून खैराचे तोडलेले झाडे वनविभागाकडुन जप्त;

चौकशीअंत कारवाई सुरु,मुरुड वनक्षेत्रपाल यांची माहिती...

रोहा / शहानवाज मुकादम 

तालुक्यातील चणेरा विभागातील खांबेरे- पांगळोली हद्दीत मुज्या चा राण आणी घागुर माळ येथील खैर हि झाडे असुन चोरटी लूट करून माती मोल भावात विकली जात आहे... या भागात  सागवानाची व खैराची झाडे जंगलात दुर्मिळ झाली आहेत...

या परिसरातील वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी अवैध खैर तोडून तस्करी करणे आश्या घटनांना वाव देण्यात येत आहे...

दुसरे कारण म्हणजेच वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्ष संपती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे...

राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने अश्या घटना कोणास ही कानडोळा न लावता करण्यात येतात...या संबंधित परिसरातील वनपाल पासुन बड्या अधिकाऱ्यांपर्यंत हात असण्याचा अंदाज असतो...

स्वार्थासाठी यंदाच्या वर्षांत सप्टेंबरपर्यंत अनेक प्रकरण समोर येत आहेत... 

 दि:1१७/०९/२०२३च्या रात्रीच्या सुमारास खांबेरे हद्दीत खैराचे झाडे स्थानिक दलालाकरुन कामगारांच्या मदतीने वृक्षतोड करुन रातोरात वाहतूक करण्याचा डाव पोलीसांनी केलेल्या गणेशोत्सव निमित्त मुंबई-गोवा महामार्गावरील बंदोबस्ता मुळे चुकला. दि:१९/०९/२०२३, रोजी मुरुड वनक्षेत्रपाल श्रीम प्रियांका पाटील मॅडम यांनी दखल घेतल्यामुळे,वनविभागाकडुन खैर तस्करी व  वृक्षतोड झाली नसल्याची खोटी माहिती दिली असताना मग  वनपाल श्री गायकवाड व कर्मचाऱ्यांना खैराचा माल कसा मिळतो, या मागचे गौडबंगाल काय आहे ?

तरी खांबेरे हद्दीतील जप्त केलेला  माल कोणत्या जागेत मिळाला त्याबाबत चौकशीअंत कारवाई सुरु असल्याची माहिती मुरुड वनक्षेत्रपाल श्रीम प्रियांका पाटील मॅडम यांनी दिली...

 खैराची तस्करी करून खांबेरे हद्दीतील खैराची लाकडे विकत घेणारा व्यापारी महाड येथील   असुन स्थानिक दलाल असल्याचे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे... वनविभागाने त्याचा शोध घेऊन मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे...


अशाच हा चोर शिपाईचा खेळ वनविभाग व खैर तस्कर यांच्या मध्ये अनेक वर्षांपासून पाठशिवणीचा जणू खेळच  सुरु झाला आहे...मात्र  वनविभागाला कायम स्वरुपी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळत नाही...

सदर प्रकरणी वनविभागाकडुन वृक्षतोड व खैर तस्कर व संबंधित  अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने वृक्षतोड होत असून 

याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होउन खैर तस्करी वर आला बसावा अशी  मागणी होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post