महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्ग परतीच्या प्रवास बेतला कोकण चाकरमानीच्या जीवावर,दुचाकीस्वार जागीच ठार सर्वत्र संतापाची लाट.


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर) 

मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर एक भयानक अपघात घडला असून चक्क एका ट्रक ट्रेलर चालकाने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या तरुणाला चिरडले...एवढेच नव्हे तर ट्रेलर चालकाने त्याला ठोकर देत काही अंतर तर्रर्रर्रर्रर्र चालकाने तरुणाला फरफटत नेल्याने सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे...तर चालक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजले आहे..

रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अखेर गौरी गणपतीच्या सणात मार्गावर २५ व २६ सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस अपघात

रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अखेर गौरी गणपतीच्या सणात आलेल्या गावी चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला कोलाड पेण दरम्यान जीवावर बेतले असून या मार्गावर २५ आणि २६ सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस मोठे अपघात झाले... मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ पेन तर सुकेळी वाकण दरम्यानच्या कानसई हद्दीत मंगळवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी एका ट्रक ट्रेलरने अप्रीला मोटारसायकल (स्कूटर) ला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.. तर या भयानक घडलेल्या घटनेमुळे मार्गावरून ये जा करणारे प्रवाशी ही हादरले तर अपघातानंतर दारू पिऊन तर्रर्रर्रर्रर्र झालेल्या ट्रेलर चालकाने सदरील तरुणाला काही अंतर फरफटत नेले असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.. मात्र सदरच्या घटनेमुले सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे...


मोटारसायकल चालकास ट्रेलर चालकांनी काही अंतर फरफटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यु 

सदरच्या घटनेची नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार २६ सप्टेंबर रोजी ट्रेलर क्रं.एमएच ४६ सीएल १२१९ दारू पिऊन तर्रर्रर्रर्रर्र झालेला ओमप्रकाश रामपाल पटेल वय ३६ मूळ रा. रिब्बा राज्य,मध्यप्रदेश, सध्या पांडापूर-पेण या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रेलर सुकेळी बाजूकडुन नागोठणे बाजूकडे दारूच्या नशेत अति वेगात रस्त्याचा विचार न करता येत असता नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानसई हद्दीतील हॉटेल नवरत्न परिसरात सकाळी ११.३० च्या. सुमारास आला असता,पुढे असलेली व संदेश सदानंद घाणेकर वय 32 मूळ रा. सावर्डे चिपळूण सध्या वडाळा मुंबई हा चालवीत असलेली अप्रीला मोटरसायकल (स्कूटर)  क्रं. एमएच ०१ ई डी ९१४१ हिला मागून जोरात धडक मारली...या धडकेत मोटारसायकल बाजूला पडली असुन सदरील मोटारसायकल चालकास ट्रेलर चालकांनी काही अंतर फरफटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला... सदरील अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहा.पो.नि. संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार गणेश भोईर करीत आहेत. सदरील ट्रेलर चालकास पोलिसांनी अटक केली आहे...

मध्यपान करून दुचाकीला धडक,वाहतुक नियमावलीचे उलंघन,निष्पाप दुचाकीस्वराचा गेला दूर्दैवी जीव 

तर मध्यपान करून ट्रक ट्रेलर चालकाने दुचाकीला धडक दिल्याने वाहतुकीच्या नियमावलीचे उलंघन केले मात्र त्यात निष्पाप दुचाकीस्वराचा त्यात दुर्दैवी जीव गेला याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.. त्यामुळे आता वाहतूक यंत्रणा या चालकावर तसेच गाडी मालकावर कोणती कारवाही करण्याचे आदेश देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे तर अपघातात अंत झालेल्या पीडितांचे कुटुंब मात्र दुःखात...

Post a Comment

Previous Post Next Post