कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास हॉटेल योगिता हिरा समोर दोन विचित्र अपघात
रोहा चणेरा मुख्य राज्य महामार्गावर शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास हॉटेल योगिता हिरा समोर दोन विचित्र अपघात घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली परंतू घडलेल्या अपघातात कोणतीही जिवित घडलेली नाही परंत अपघाताची घटना भयानक यात सुरवातीला एक छोटा हत्ती मालवाहू टेम्पो क्रमांक एम एच ०६ बी डब्लु ५७९५ चनेराकडून रोहाकडे येत असताना अचानक एक गाय समोर आली तिला टेम्पोची जोरदार धडक बसल्याने ती गंभिर जखमी झाली..तर टेम्पोचा पुढील भाग चेपल्याने खूप नुकसान झाले आहे...
कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे कुटुंब सुखरूप बाहेर
तदनंतर लागोपाठ पुन्हा दहा मिनिटांनी त्याच जागेवर एका स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला...मुरुड काशिदबीचवर पर्यटनासाठी गेलेली फॅमिली ही रोहाकडे परत येत असताना हा अपघात घडला...तर कार क्रमांक एम एच ०४डी आर ३८८२ या कारमधून एक परिवार पर्यटन करण्यास मुरुड काशीदबीचवर गेले होते...तसेच ते पुन्हा माघारी रोहाकडे येत असताना गोफण नजीक हॉटेल योगिता हीरा नजिक रात्री आठच्या सुमारास चालत्या कारने पेट घेतला आणि एकच खळबळ उडाली मात्र कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे कुटुंब हे सुखरूप बाहेर आल्याने सुदैवाने जिवित हानी घडले नसल्याचे समजले...
हॉटेल कर्मचारी तसेच नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन विजवली आग... पेट घेतल्याने कारचे नुकसान
शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजले तर चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती तर हॉटेलात काम करणारे कर्मचारी तसेच नागरिकांनी पेट घेतलेली कार विझवण्यात अथक परिश्रम घेतले व ती आग आटोक्यात आणली...तसेच पेट घेतल्याने कारचे खूप नुकसान झाले आहे...
