जीवघेण्या खड्ड्यातून पनवेल- महाड एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची कोलाड आंबेवाडी येथे प्रसूती
कोलाड प्रतिनिधी( श्याम लोखंडे ): मुंबई- गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे...या जीवघेण्या खड्ड्यातून पनवेल- महाड एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची कोलाड आंबेवाडी येथे प्रसूती झाली असून सदर महीला ही सुखरूप आहे तर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर मातेसह बाळाला अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले आहे...
पेण वडखळ येथून कोलाडकडे येण्यासाठी पनवेल-महाड क्र. एमएच.१४ बीटी २६३२या एसटीने करीत प्रवास
सुशीला रवी पवार ( रा. रुद्रोली ता माणगाव) असे गरोदर महिलेचे नाव असून शनिवार ( ता.९ ) रोजी दुपार नंतर पेण वडखळ येथून कोलाड कडे येण्यासाठी पनवेल - महाड ( क्र. एम. एच.१४ बीटी २६३२ ) या एसटीने प्रवास करीत असताना सदर एसटी बस सायंकाळी ६ वा. च्या सुमारास कोलाड नजीकच्या पुई महिसदरा पुलावर आली असता चालक पुलावर असलेल्या खड्ड्यातून मार्ग काढत असताना अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले.. व तिला कळा सुरु झाल्या असल्याचे लक्षात येताच सदर एसटी चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार यांनी प्रसंगावधानाने एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून महिलेला रुग्णालयात दाखल केले...
बाळाचे वजन कमी असल्याने मातेसह बाळाला अलिबाग शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल
या आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेले डॉ. व्ही.बी.टिवडे व डॉ. एम. एस.वाघ यांनी महिलेची सुखरूप प्रसूतीसाठी शर्तीचे प्रयत्न करून नॉर्मल डिलेव्हरी झाली...यावेळी तांबे नर्स व लक्ष्मण होगाडे यांनी देखील सहकार्य करून केले..या महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असल्यामुळे मातेसहित बाळाला अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...
