अडणाले गावचा हृतिक मोरे भारतीय सैन्य दलात दाखल.
तळा तालुक्यातील मौजे अडणाले येथील हृतिक हिरू मोरे हा तरूण भारतीय सैन्य दलात दाखल झाला आहे... शनिवारी तो आपल्या अडणाले या गावी आला असता अडणाले ग्रामस्थांनी त्याचे वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करीत जोरदार स्वागत केले...
देशासाठी काहीतरी बाळगले होते ध्येय
गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या हृतिकने आपण कोणतीही खाजगी नोकरी न करता देशासाठी काहीतरी करावे हे ध्येय मनाशी बाळगले होते...आणि अत्यंत गरीब परिस्थितीतही त्याने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सैन्यदलाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला...तसेच रायगड करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन कठोर परिश्रमास सुरुवात केली...आपल्या कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर हृतिकने मैदानीसह लेखी परीक्षेत उत्तीर्ण होत मेरीट लिस्टमध्ये आपली जागा मिळवली...तसेच हैदराबाद येथे सात महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला...
गावासह तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
त्याने मिळवलेल्या या यशानंतर त्याच्या गावासह तालुक्यातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला...मला मिळालेल्या यशामागे माझे आई वडील व मामा मामी यांचे मोठे योगदान असून भविष्यात माझ्या गावासह तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण सैन्यात भरती कसे होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हृतिकने सांगितले...
.jpeg)