महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार संरक्षण कायद्याची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी

अलिबाग प्रतिनिधी:

मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या नेतृत्वाखाली..रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची निदर्शने

राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत... पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे...विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी होत नाही...या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्या सर्व शाखांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कठोर अंमलबजावणी अभावी कुचकामी ठरलेल्या संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला... तसेच जिल्हा प्रशासन आणि  पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायदयाची सक्त अंमलबजावणी आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली... मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायद्याच्या मसुद्याची होळी करीत निदर्शने करण्यात आली... यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव अनिल भोळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे रायगड जिल्हा निमंत्रक विजय मोकल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर, रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष उमाजी केळुसकर, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा संघटक नागेश कदम, उपाध्यक्ष सीमा मोरे,  खजिनदार दरवेश पालकर, माजी अध्यक्ष भारत रांजणकर, सल्लागार भाई ओव्हाळ, अलिबाग प्रेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश कांबळे, प्रफुल्ल पवार, सचिव ॲड राजेश भोस्तेकर, पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवराज पार्टे आदी उपस्थित होते...

पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी केला आपला रोष व्यक्त 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या पुढाकाराने दिनांक १७ ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी या संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले... अलिबागमध्ये रायगड प्रेस क्लब रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ,अलिबाग प्रेस असोसिएशन, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा , हल्ले करणाऱ्यांचा आणि कायदयाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारच निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या... पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी आपला रोष व्यक्त केला... त्यानंतर सर्व पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  यांची भेट घेऊन चर्चा केली...पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे... पाचोऱ्याच्या घटनेत पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द व्हावे...अश्या मागण्या करून निवेदन देण्यात आले...या आंदोलनाला जिल्ह्यातून  ज्येष्ठ पत्रकार नरेश कुशवाह, समाधान दिसले, सुयोग आंग्रे, महेंद्र दूसार, प्रणय पाटील, किशोर सुद, धनंजय कवठेकर आदी उपस्थित होते...

सर्व पोलिस ठाण्यात कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण-एस पी घार्गे

पत्रकारांच्या शिस्टमंडळाने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही गंभीर बाब असून या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी काटेकोरपने व्हावी यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात प्रशिक्षण देवून माहिती देणार असल्याचे सोमनाथ घार्गे यांची सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post