रोहा प्रतिनिधी शहानवाज मुकादम
रक्कमेच्या जमा खर्चाची आणि ग्रामपंचायतचे बँक खाते किती?याबाबत माहिती देण्यास टाळाटळ सभा अर्ध्यातच बरखास्त ...
तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत येये १४ ऑगस्टची तहकूब ग्रामसभा दि२२/0८/२३,रोजी खैरेखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली...सदर सभेत अजेंड्यावरील चार विषय घेण्यात आले असुन मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून मंजुर करणे हाविषय ग्रामसेवक यांनी जाणुन बुजून घाल केला...सदर सभेचे अध्यक्ष यांच्या परवांगीने आयत्या वेळच्या विषयात खैरेखुर्द गावचे मुस्लिम समाज अध्यक्ष श्री.आजीम धनसे यांनी ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांना 15 व्या वित्त आयोग निधी बाबत जमा खर्चाची विचारणा केली आसता ग्रामसेवकाने उडवाउडवीचे उत्तर दिले...खैरेखुर्द गावात अस्वच्छता असुन कचऱ्याचे साम्राज्य दिसुन येते..लोकसंख्येनुसार १५ व्या वित्त आयोगातील निधी प्रत्येक माणसी ९५७/- रक्कम रुपये इतकी असुन ग्रामपंचायत या निधीचा वापर खैरेखुर्द गावासाठी न होता एका व्यक्तीच्या लाभा साठी मालकी शेतजमिन बंदिस्त गटार बांधण्यात आले असुन सदरच्या केलेल्या तक्रारीबद्दल काय झाल?तसेच गटार मंजूर करणे कामी केलेल्या आराखडय़ातील ठरावाचे वाचन करणे व एकोण रक्कमेच्या जमा खर्चाची आणि ग्रामपंचायतचे बँक खाते किती?याबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटळ करुन सदरची सभा अर्ध्यातच बरखास्त केली...
खोटे ठराव व कामात अनियमित्ता असल्याने ग्रामपंचायत दप्तर तपासणीची मागणी...
नव्याने पदावर विराजमान झाले ले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री अनिल साळावकर व अन्य ग्रामस्थांकडून ग्रामसेवक यांच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली...तसेच ग्रामसेवक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असुन वरीष्ठांनी दखल घेऊन ग्रामपंचायतची १५ व्या वित्त आयोग निधी आराखडय़ातील मंजूर ठरावाची माहिती व जमा खर्च,बियर बार शॉपचा खोटा ठराव लिहणे,सभेत ठरल्याप्रमाणे सभेत विशेष ठराव न लिहणे व वाचन न करणे, अपुर्ण घरकुल,कामाच्या ठिकाणी फलक न लावणे,जलजिवन मिशन योजनेची माहिती न देणे,ग्रामपंचायत पासबुक व जमा खर्चाची ग्रामसभेत माहिती न देणे या विषयी ग्रामसेवक यांची तात्काल बदली करून खैरेखुर्द ग्रामपंचायतची दप्तर तपासणी करून चौकशीअंत कारवाईची मागणी होत आहे...
