रोह्यात गेली काही महिने वेश्या व्यवसाय सुरू आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. रोहयात अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांच्या बोलविलेल्या बैठकीतही याविषयी उघड उघड नाराजीही व्यक्त झाली होती... शुक्रवारी रात्री उशिरा रोहा पोलीसांनी दमखाडी येथिल श्रीराम लॉजवर धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्यां एकास ताब्यात घेतले... तर तीन महिलांची सुटका केली आहे...दरम्यान रोहयात अवैध धंद्यांचे नेटवर्क चालविणाऱ्या मुळमालकांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी रोहेकरांची मागणी आहे...
नेटवर्क चालविणाऱ्या मुळमालकांवर कारवाई व्हावी रोहेकरांची मागणी
रोहयात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले... काही दिवस नागरिकांतुन ओरड सुरू आहे...पंधरा दिवसांपूर्वी याविषयावर रोहयात सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकत्रित बैठकही झाली होती... त्यामध्ये नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अवैध धंद्यांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली होती... गुरुवारी रोहयातील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती... याची दखल घेत पोलिसांचे शुक्रवारी रोहयात धाडसत्र सुरु होते...रात्री उशिरा शहरातील दमखाडी येथिल श्रीराम लॉजवर ही कारवाई करण्यात आली... या लॉजवर पीडित महिलेंना गिर्हाईक पुरवून देह व्यापार सुरू होता... या कारवाईत ३ महिलांची सुटका करून आरोपी संजय वाघमारे विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे... याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर हे करीत आहेत..रोहयातील अवैध धंद्यांविरोधातील ही कारवाई लुटुपुटीची नसावी...येथे रोजंदारीवर कामावर ठेवलेल्या आणि ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या छोट्यामोठ्या गरजू तरुणांवर ही कागदोपत्री कारवाईचे सोपस्कर नसावेत... तर हे नेटवर्क जेथून चालतात त्यांच्यावर ते चालविणाऱ्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी अशी रोहा प्रेस क्लबने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी केली आहे.
