महाराष्ट्र वेदभुमी

पालक शिक्षक असोसिएशन जेएनपी विद्यालयाच्या उपाध्यक्ष पदी विकास कडू यांची बिनविरोध निवड




उरण  प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे )

१२५० पालकांचा नेतृत्व करण्यासाठी पालकांनामधून उपाध्यक्षपदी निवडणुक 

दिनांक २३ ऑगस्ट: २१/८/२०२३ सोमवार रोजी आरकेएफ जेएनपी विद्यालय सेकंडरी इंग्रजी माध्यमची पालक, शिक्षक असोसिएशन (P.T.A.)कमीटी निवडणूक होती...सेकंडरी इंग्रजी माध्यमचे १२५० पालकांचे नेतृत्व करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक वर्गात पीटीए मेंबर निवडतात.म्हणजे २५ वर्गात २५ पीटिए मेंबर्स निवडले गेले होते...त्यामधून पालकांचे नेतृत्व करण्यासाठी उपाध्यक्ष निवडले जाते...आणि पालक शिक्षक असोसिएशन २०२३/२०२४साठी कमेटी स्थापन करतात... त्या कमेटीमध्ये अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे जे कोण प्रीन्सिपल असतो तो अध्यक्ष पदावर विराजमान होतो... तर १२५० पालकांचा नेतृत्व करण्यासाठी पालकांनामधून निवडणूक करून उपाध्यक्ष निवडला जातो.. 

उरण तालुक्यातील समाजसेवक विकास कडू यांची बिनविरोध निवड

यावर्षी आरकेएफ जेएनपी विद्यालयामधून पालक बंधु भगिनी यांनी उरण तालुक्यातील समाजसेवक  विकास कडू यांची निवड केली आहे...ही निवडणूक बिनविरोध झाली... यावर्षी निवडलेल्या उपाध्यक्षचा काळ हा २०२३/२०२४ पर्यंत  आहे.उपाध्यक्ष पदी निवडून आलेले  विकास कडू हे उरण तालुक्यातील समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगडचे संस्थापक अध्यक्ष आहेत...विकास कडू हे सामाजिक क्षेत्रात ८ वर्ष कार्यरत आहेत...या समाजसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे...

आरकेएफ जेएनपी विद्यालयात पालकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे प्रयत्न करेन...विकास कडू 

उपाध्यक्ष पदावर विकास कडू यांची निवड झाल्याबद्दल विकास कडू म्हणले की "सर्व प्रथम मी सर्व पीटीए मेंबर्स आणि १२५० पालकांचे ऋणी राहील की त्यांनी मला या पदासाठी विनविरोध निवडून दिले...मी आरकेएफ  जेएनपी विद्यालयात पालकांचे जे काय प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे  सोडवण्याचे  प्रयत्न करेन असे वचन देतो... मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे हित कसे होईल यावर काम करण्याचा प्रयत्न करेन ".विकास कडू हे शाळेच्या विकासासाठी अनेक वर्ष लढत होते...त्यामुळे त्यांची निवड झाल्याने सर्व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे...या नियुक्तीबद्दल त्यांच्या वर सर्वच स्तरातून अभिनंदचा वर्षाव होत आहे...तसेच उरण तालुक्यातील काही समाज सेवक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटून प्रत्यक्ष, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रित्या शुभेच्छा दिल्या आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post