सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्प अमलतास संकुल सिल्लारी येथे बॅनियन ट्री फाउंडेशन द्वारा १३ जानेवारीला आयोजित निसर्गदुतांच्या कार्यशाळेला प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांची आकस्मिक ग्रेट भेट लाभली. मुलांशी संवाद साधताना “माणसापेक्षा झाडे व प्राणी मोठी” असल्याचे प्रतिपादन सयाजी शिंदे यांनी केले...
याप्रसंगी बॅनियन ट्री फाउंडेशनचे सहायक संचालक संजय करकरे सर, संपदा करकरे मॅडम, शिक्षणाधिकारी अमेय परांजपे, जगदीश धारणे, राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरीचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे तसेच विविध शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते...
