कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात थंडी सूरू होताच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत असल्याचे दिसुन येत आहेत. मागील दोन दिवसांपासून पहाटे मोठ्या प्रमाणात सगळीकडेच दाट धुक्याची चादर पसरली असल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला असल्याने थंडीच्या प्रमाणात पंरतु या पहाटेच्या दाट धुक्यामुळे रोहा कोलाड मार्ग तसेच ग्रामीण भागातील सडक मार्गावर वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असताना दिसून येत होता तर ग्रामीण भागांतील सडकेच्या दुतर्फा मार्गाला उंच वाढलेले काटेरी झुडपे आणि गवत त्यामुळे समोरील येणारी वाहन किंवा पादचारी माणूस पाच ते सहा फुटाच्या अंतरावर दिसून येते नसल्यामुळे दुचाकीस्वार चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती...
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे परीसरात पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण येवढे होते की वाहनचालकांना वाहने चालवतांना चार ते पाच फुट अंतरावरील काहीच दिसत नव्हते... त्यामुळे अनेक वाहन चालकांना धीम्या गतीने वाहने चालवावी लागत होती... तर मोठया प्रमाणात थंडी सहित धुक्का त्यातच हलकासा दव त्यामुळे मोठा थंडावा निर्माण होत आहे... तसेच धुक्यात जणू काही रस्तेच हरवले होते असे दिसून येत होते...
