महाराष्ट्र वेदभुमी

ज्येष्ठ नागरीक मंडळ रोहा तर्फे १ऑक्टोबर जागतीक वृद्ध दिन उत्साहात साजरा

 

कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

ज्येष्ठ नागरीक मंडळ रोहातर्फे ज्येष्ठ नागरीक सभागृह रोहा येथे या कार्यक्रमाचे आयोजन

१ ऑक्टो हा जागतीक वृद्ध दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो... प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही १ ऑक्टोबर हा वृद्ध दिन साजरा करण्यासाठी ज्येष्ठ नागरीक मंडळ रोहातर्फे ज्येष्ठ नागरीक सभागृह रोहा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्री.सरस्वती पुजनाने करण्यात आली... कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीकाना आपले वाढत्या वयोमानानुसार सुखी आनंदी व सुरक्षित कसे जीवन जगावे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी रायगड जिल्हा ज्येष्ठनागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर तसेच दिनदुबळ्या सामान्यांसाठी सेवाभावी वृत्तीने औषधोउपचार करणारे रोहा चे सुप्रसिद्ध डॉ. फरीद चिमावकर खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते...

विचारमंचावरील उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केले स्वागत 

कार्यक्रमात विचारमंचावरील उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करणेत आले...व ज्या ज्येष्ठ नागरिकांनी वयाची ८० वर्षे पुर्ण केले...त्या सर्वश्री हर्षद मंगलदास शहा, मानमल गोमाजी बोराणा, नारायण गणपत देशमुख, गणपत रामचंद्र खामकर, यशवंत गणपत ठाकूर, श्रीकांत नथुराम मोहरे, श्रीमती शिला सदानंद मोरे, शांताबाई वामन भोळे, उषा मधुकर केळकर यांचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व समानपत्र देऊन गौरव करण्यांत आला तसेच त्याना शुभेच्छा देण्यांत आल्या... 

ज्येष्ठांसाठी हाडांची कमकुवता,हृदयविकार,हाताचे कंप इ० तपासणी शिबीर करण्याचे डॉ.फरीदांनी केले आश्वासित

या वयात मुख्यतः गुडघे दुखी, कंबरदुखीचे आजार होत असतात, मधुमेह रक्तदाब हे कॉमन आजार झाले आहेत... ज्येष्ठाना आरोग्यविषयक सल्ला अथवा उपचार करताना त्यांचेशी सौजन्याने व आपुलकीने वागून त्यांची मानसिकता स्थिर राहावी याकडे कटाक्षाने लक्ष दिले तर ते अशा आजारांना धैर्याने समोरे जाऊ शकतात...ज्येष्ठ नागरीकांसाठी हाडांची कमकुवता, हृदयविकार, हाताचे कंप इत्यादी तपासणी व उपचारासाठी माझ्यातर्फे  मोफत शिबीराचे आयोजन करण्याचे त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले....डॉ. फरीद ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना म्हणाले...

प्रशासनाकडून अंमलबजावणी नाही,ज्येष्ठ नागरीकांसाठी  धोरण नाही व्यक्त केली खंत...अध्यक्ष पांडुरंग सरफळे 

जिल्हा समन्वय समितीचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे सर यानी सांगीतले की नव्या पिढीचे विचारांशी आपण जुळवून घेणे महत्वाचे आहे...डॉ श्रीनिवास वेदक यांनी ज्येष्ठांनी आनंदी कसे रहावे याची माहिती उदाहरणे देवून पटवून दिली...सदानंद मेहेंदळे सरयांनीही उपस्थितांसमोर त्यांचे विचार मांडले...जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग सरफळे रावसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की ज्येष्ठांचे जीवन सुखी, सुरक्षित व आनंदी राहण्याचे दृष्टीने आम्ही आमचे स्तरावर कायदेविषयक, आरोग्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो...परंतु शासनाने ज्येष्ठ नागरीकांसाठी वेळोवेळी जे धोरण नाही केले त्याची अंमलबजावणी शासन प्रशासनाकडून होत नाही, असे सांगून त्याबद्दल खंत व नाराजीही त्यांनी व्यक्त केली...जिल्हा अध्यक्षाने याबद्दल त्यांचे स्तरावर अथवा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघामार्फल ठोस पावले उचलावीत, त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही देण्यास समर्थपणे तयार आहोत असे ही त्यांनी वचन दिले...

औषधोपचार व औषधे मिळाली पाहिजेत सवलतीचे दराने 

प्रमुख अतिथी सुरेश पालकर यानी मार्गदर्शन करताना सांगीतले मंडळाचे अध्यक्षांनी व्यक्त केलेली खंत व नाराजी ही सत्य आहे, महाराष्ट्र ज्येष्ठनागरीक महासंघामार्फत शासनकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक कुटुंबास निर्वाह भत्ता रु १००००/- मिळाला पाहिजे...औषधोपचार व औषधे सवलतीचे दराने मिळाली पाहिजेत...पोलीस यंत्रणेने ज्येष्ठांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना सहकार्य व मदत केली पाहिजे... स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांना मिळणा-या शासकीय अनुदानाचे ३% रक्कम ज्येष्ठ नागरीकांसाठी खर्च केली पाहिजे.. इत्यादि मागण्यांविषयी त्यांनी उपस्थितांना सांगीतले... या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी वेळीच अंमल बजावणी न झाल्यास मोर्चा, आंदोलन, उपोषण या मार्गांचा अवलंब करावा लागला तरी त्यासंबधीचाही कारवाई केली जाईल... असेही त्यांनी अभिवचन दिले...आ. खासदारांचे भरमसाठ वेतन भत्ता व सवलती बद्दलचा उल्लेख करून ज्या ज्येष्ठ नागरिकांनी देशाचे विकास व प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे... त्यांनी सुखी व सुरक्षित जीवन जगावे म्हणून त्यासाठी आर्थीक तरतूद अर्थसंकल्पात नसावी ही बाब देशाच्या राज्यकारभारास शोभादायक नाही असेही म्हणाले...

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सुरेश मोरे, प्रकाश पाटील, सुधाकर वालेकर, शरद गुडेकर अनंत पाटणकर, नारायण  पाटील, सुधाकर गड़करी, गजानन वैद्य, नंदकुमार भादेबर, गावडे गुरुजी, शैलजा देसाई, संजीवनी कडवेकर, संध्या मळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.तर सूत्र संचालन सचीव सुरेश मोरे सर यानी केले...आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शांताराम गायकवाड यानी केले .. कार्यक्रमाची सांगता सह स्नेहभोजनाने करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post